सागर किनारा
सागर किनारा
सायंकाळचा प्रहर
मंद मंद वाहणारा हा बेभान वारा
उसळणार्या लाटा बघून जणू अंगावरती उठतो शहारा
रम्य हा सागरी किनारा अन् सभोवताली नारळच्या बागा पांढरीशुभ्र वाळू, तिचा
सुगंध हा निराळा
रंगीबेरंगी दगडांच्या जाती निळसर पाण्यात
शंख-शिंपल्यासह वाळूत स्तब्ध
झाला रेखाकृती किनारा
जवळ असून पाणी अतृप्त हा बिचारा
अप्रतिम निसर्ग सौंदर्य हे
निळे आकाश वरती
निळेशार पाणी
या रत्नांकराची महती
वर्णावी कोणी..?
साठवू कशी प्रतिमा या लोचनी
हे ईश्वरा
सदैव अशीच निर्मळता राहू दे माझ्या मनी🙏😊
