गावकुस
गावकुस
आम्ही होतो गावकुसात
बंदिस्त कारागृहात....
का वर्ण गिधाडांच्या सहवासात
गावकुसात राहून करत होतो
चाकरी गावकऱ्याची
तरीपण मिळत होती ...
अपमानाची शिळी भाकरी.....
घासत होते सुऱ्यावरती सुऱ्या
केवळ भरावे टीचभर पोटाचे खळगे
माखत होते हात आमचे रक्ताने
स्वाभिमान शून्य असल्याने....
ज्ञानसूर्याचे किरण जेव्हा गावकुसात शिरले
रक्ताने माखणारे हात शाईने रंगले
महारवाड्याचा राजवाडा झाला
लाखो किमंतीचा स्वाभिमान
लेखणीने दिला...
