अस्तित्व
अस्तित्व
अनवाणी पाय खाचखळग्याला जुमानत नाहीत
ध्येयाकडे चालणाऱ्या पायासाठी रस्ता स्वर्ग असतो
रुळ जेव्हा रस्ता बनतो
स्वर्ग फक्त दोन मिनिटाचा असतो
रस्ता लॉकडाऊन करता येतो
इच्छाशक्ती लॉकडाऊन करता येत नाही
हातावरचं पोट तळहातावरच्या फोडाप्रमाणे
जपावं लागतं
शेवटी ऑक्सिजनच ठरवतो तुमचं उरलं सुरलं अस्तित्व.
