STORYMIRROR

" पुष्पाग्रज. " गायकवाड आर.जी.

Abstract Inspirational

3  

" पुष्पाग्रज. " गायकवाड आर.जी.

Abstract Inspirational

आठवण

आठवण

1 min
234

आठवण तुझी होता

मी विसरून मज जातो,

तुझ्या भेटीसाठी रोज

अतूर फार होतो.


नसेल भेटायचे तरी

भेटून एकदा पहा,

जानून माझे हे हाल

तू खुशाल माघारी जा.


विसरून जाणे मला

जमणार मुळीच नाही,

मेलोतरी चालेल

मी मरेन तुझ्या पायी.


शपथ घेऊन सांग

तू शपथ ती विसरलीस..

जगतेस तू खुशाल

मला का ग मारलीस...


मी मात्र झुरतोय रोज

तुझ्या आठवणीत,

मागतोय मरण मी

विसरून. ती ग प्रित.


विसरून जा मला तू

लई असते वाईट आठवण,

झुरण्यापेक्षा मला ते

यावे खुशाल मरण..


Rate this content
Log in

Similar marathi poem from Abstract