आई.....
आई.....
काय सांगू महिमा मी
माझ्या आईच्या मायेची
शांत शीतल थंडगार
घनदाट त्या छायेची...
सावळी सुदंर मूर्ती ती
रुप तिचे गोजीरवाणे
आई माझी आहे खरे
शंभर नंबरी सोने....
निराशेच्या क्षणी
आशा भरी माझ्या कानी
गोड गोष्ट जीवनाच्या
हळु सांगे माझ्या कानी....
नाही शिकली ती शाळा
पण बनली शाळाच जीवनाची
आहे अडाणी माझी आई
पण खरी खान ती ज्ञानाची
संकटाच्या वेळी ती
होते माझी पाठीराखी
हितगुज सांगे मज ती
बनुन माझी प्रिय सखी.....
झेलते आघात मजवरचे
ती आपुल्या जीवावरी
निर्भय सदा राहते मी
तीच्या उबदार पंखाखाली...
जीवन मज करी बोध
मूल्य आदर्श जीवनाचा
आई माझी जणु काही
अफाट सागर अमृताचा....
केली दौत सागराची....
लेखणी त्या वटवृक्षाची
कहाणी माझ्या आईच्या मायेची
तरी लिहुन नाही संपायची
