मन
मन
मन मोरपीस
मऊ अलवार
झुळकेसमान
स्पर्श हळुवार
मन चंचलचि
विहरे अंबरी
कधी भुईवरी
कधी जलावरी
मनाचा पहारा
नित्य मनूवरी
कर्म करताना
नजर अंतरी
प्रेम माया दया
मन संवेदना
वियोग घडता
अश्रू नयनांना
कपट लबाडी
सहन ना होते
अंगार वर्षूनी
चीड व्यक्त होते
दुःखात उदास
ना कोणी जवळी
आप परक्यांची
मना जाण होई
प्रेमात पाखरु
दुनिया फिरते
रंगात गहि-या
न्हाऊन निघते
वेड्या मना तुझ्या
लीला अगाधचि
आस्तित्व असूनी
असे अदृश्यचि
