Become a PUBLISHED AUTHOR at just 1999/- INR!! Limited Period Offer
Become a PUBLISHED AUTHOR at just 1999/- INR!! Limited Period Offer

Neha Ranalkar

Abstract Inspirational

3  

Neha Ranalkar

Abstract Inspirational

आजीच्या गोष्टी

आजीच्या गोष्टी

1 min
401


आजीच आठवत रहाते

आज मलाच जर अंधुकशी |

सांगू तरी आजीच्या गोष्टी

आज मी तुंम्हाला कशी? | |१| |


तिला दिली आणून चिंचा बोरे

आठवते सांगायची गोष्टी मग ती |

राम कृष्ण संत पात्र तिच्या कथेची

कधी संस्कृती, संस्कार डोकावती | |२| |


आठवते एकदा तर तिच्या गोष्टी

ऐकता गेलो इतके गुंगून‌ |

आई ओरडून गेली रागे आमच्या

शिवाय गेली झोपी रुसून | |३| |


आजही आठवते नेसवलेली जाता

तिला अखेरची गुलाबी नववारी |

नभ गुलाबी दिसताच गडगडताना

वाटे आम्हा आजी दळे जात्यावरी | |४ | |


Rate this content
Log in