गावाकडे
गावाकडे
शहरात जरी थाट सगळा
गावाकडच्या मातीचा रंग हा आगळा
लाल तांबडी माती
कौलारू घरांनी
साकारलेली छत अन्
डोलणारी हिरवीगार
भाताची शेती
खळखळणारे झरे, झुळझुळ वाहणारं नदीचं पाणी
शेत शिवारात फळांच्या बागा
वारा गातो येथे मंजुळ गाणी
सर्वत्र दिसून येते
निसर्गाची उधळण
उंच उंच डोंगर रांगा
रस्ताची नागमोडी वळण
सारवलेल्या प्रत्येक दारी आनंदाची पखरण
खुले आभाळ, खुले मन,
जिवंत आहे अजुन ही माणूसपण
सण उत्सव एकोप्याने आनंदाने
साजरे करून प्रेमानी
नांदती येथे सर्वजण
निसर्गाच्या सानिध्यात घराला आहे घरपण
घरी आलेल्या पाहुण्यांचा केला जातो पाहुणचार
शहरातील फ्लॅट सारखे कधीच
बंद नसतात येथे दार
गावाची व्याप्ती जरी छोटी
माणसांची मन असतात
खूप मोठी
संकटकाळी धावून येतात
प्रेमाची आपुलकीची नाती अलगदपणे जपतात
गावाकडे नवरत्नांच्या जणू खाणी
संपता संपत नाही गावाची अशी ही कहाणी....
वाटते ....जीव रमला शहरात तरीही मन कसे रमावे...?
पावले वळतात अचानक मग आठवणीतल्या त्या गावाकडे....
