STORYMIRROR

jaya munde

Inspirational

3  

jaya munde

Inspirational

गाव

गाव

1 min
199

🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷

  कोरोनाचा दुर्दैवी काळ

  गावाकडे साऱ्यांची धाव,

  बदललं इथेही सारंच गड्या

   पहिल्यासारखा न उरला गांव.


  शहराची छाप आता 

  गावानं धारण केली,

  माया, ममता गड्या

  कुठंच नाही दिसली...


  जो, तो आपापल्या नादात

  कुणाची कुणाला खबर नाही,

  ज्याला, त्याला आपलीच पडली

   गड्या परसुखाचा सूरच नाही.


  पहिल्यावानी पाहुणचार

  गावात आता होत नाही,

  रसपोळीच्या पंगतीची

   मजाच दिसत नाही.


   हुरडा,ओंबीची पार्टी

   शेतातही रंगत नाही,

   मणभरून गोडवा गड्या

   ऊसातही आता नाही....


  एकत्रीत कुटूंब मेळा

  गोकूळ ते हरवले,

  म्हातारा -म्हातारी

  एकटेच रे पडले....


  भाऊ-भाऊ झाला वैरी

  कुणी न कुणास पुसेना,

  कोरडे पडले गाव गड्या

  पूर्वीचे काहीच दिसेना....


  गाव-शहरात आता

  फरक उरला नाही,

  गावामध्ये आता गड्या

  ती मजाच कसली नाही...


उदास झालं मन माझं

बदललेलं गाव पाहून,

निघालो परत कायमचं

डोळा आलं पाणी पुसून...

🌷🌷🌷🙏🙏🌷🌷🌷


Rate this content
Log in

Similar marathi poem from Inspirational