STORYMIRROR

Suresh Kulkarni

Classics

4  

Suresh Kulkarni

Classics

गातो तुझेच गीत

गातो तुझेच गीत

1 min
250

गातो तुझेच गीत देवा

गातो तुझेच गीत

कंठातूनी येवो मधुर

मधुर स्वर संगीत

गातो तुझेच गीत देवा

गातो तुझेच गीत


उमटू दे शब्द स्पष्ट तो

हृदयी पोहचू दे भावना

हो प्रसन्न कंठी ओठी

वाहू दे स्तुतीगीत

गातो तुझेच गीत देवा

गातो तुझेच गीत


षडजातूनी प्रदीप्त हो अग्नी

रिषभातूनी प्रगटो ब्रम्हा

गांधारातूनी गानसरस्वती

मध्यमी पूजनीय शिवमहा

पंचम लक्ष्मी प्रसन्न होवो

धैवत आदि गणेश

निषाद सुर्य तळपत राहो

वाहू दे धमनीतूनी संगीत

गातो तुझेच गीत देवा

गातो तुझेच गीत


Rate this content
Log in

Similar marathi poem from Classics