एकटा
एकटा
कोण कुणासाठी इथे
वाट पाहतो
बहुतेकदा माणूस गर्दीत
एकटा राहतो || 0 ||
जग मॉडर्न होत असताना
माणसातली वाढत आहे दरी
माणसाची माणसाशी असलेली
ओळख होत आहे खरी
आपली दुःख आपणच
एकटा साहतो
बहुतेकदा माणूस गर्दीत
एकटा राहतो || 0 ||
माझ्या दुःखाला तो जबाबदार
हिच धारणा असते
आपणच आपल्याशी केलेली
हिच प्रतारणा असते
दुसऱ्यांच्या नावाने आपण
तिलांजलीच वाहतो
बहुतेकदा माणूस गर्दीत
एकटा राहतो || 1 ||
