एका विषाणूने शिकवलं
एका विषाणूने शिकवलं
शिकतच गेलो रोज प्रगतीचा पाढा
विषाणूने शिकवला आयुष्याचा धडा
शिकून सवरून मोठे फक्त नावालाच झाले
माणुसकी विसरली कोणी कामी नाही आले
संकटात आले तेव्हा कळला गावगाडा
विषाणूने शिकवला आयुष्याचा धडा
पैसा होता डोक्यामध्ये घुमत होते वारे
अडचणीत मात्र दिसे नाते गोते सारे
गर्वानेच गेला होता नात्याला या तडा
विषाणूने शिकवला आयुष्याचा धडा
नासधूस झाली सारी निसर्ग कोपला
बळीराजा माय बाप नाही रे जपला
जगाचा पोशिंदा घेतो पोसण्याचा विडा
विषाणूने शिकवला आयुष्याचा धडा
पद प्रतिष्ठा पैशाने रे दिला मोठा दगा
खेड्यामध्ये जगण्याची आहे खरी मजा
माणुसकीच्या श्रीमंतीने माणूस होतो बडा
विषाणूने शिकवला आयुष्याचा धडा
शिक्षणाने दाखवली जरी दुनियादारी
प्रलयाने रुजवली राष्ट्रीय मूल्य सारी
विश्वासाने लढू पुन्हा माणुसकीचा लढा
विषाणूने शिकवला आयुष्याचा धडा
