STORYMIRROR

Anil Chandak

Inspirational

4  

Anil Chandak

Inspirational

एक रोप तरी लावावे

एक रोप तरी लावावे

1 min
441

उघडे डोंगर,उजाड रानवाटा,

ओकी बोकी,दिसती सारी !

रूक्ष,वैराण,दृश्य भासते डोळ्यांला,

करूणेने,तडप उठते भारी!!1


नाही उरल्या वेली वनस्पती,

कडी ,तुटली निसर्गाची !

मानवाच्या, हव्यासापायी,झाली,

हानी,अपरंपार पर्यावरणाची !!2


स्वार्थी,माणुस भरधाव सुटला,

धरूनी,भौतिक प्रगतीची वाट!

महामार्गासाठी, पोखरले डोंगर,

वृक्षांची,झाली,सरसकट मारकाट !!3


पर्जन्यमान, प्रमाण घटले,

तपमान,भरोश्याचे ना राहिले!

तगमग झाली,प्राणीमात्रांची,

जगणे, आता मुश्किल झाले !!4


एक रोप,तरी लावावे प्रत्येकाने,

वसुंधरेचे रक्षण करण्यांसी!

वृक्ष,वनस्पती,सोयरे वनचरी,

हानी,वाचविण्या पर्यावरणाची !!5


फुलतील,पुनरपि डोंगरमाथे,

समीर ,  वाहिल  वेगाने !

अडविले,जातिल काळे ढग अंबरी मेघांचे,

बरसतील ,धो धो जलधारा वेगाने!!6


खळखळ वाहतील,नद्या निर्झरे,

हिरवाईचा,अपुर्व खजाना,सौंदर्याचा!

बहरतील रानवने,फळफुलांनी,

हटेल दुर्भिक्ष्य, इथे पाण्याचा !!7


जगा स्वत: ही,अन दुसऱ्यांना,

जगु द्या, तुम्ही प्रेमभावाने !

वसुंधरा, ही आपली माता,

प्रतिपाळ, करू तिचे आपुलकीने !!8


Rate this content
Log in

Similar marathi poem from Inspirational