STORYMIRROR

jaya munde

Inspirational

4  

jaya munde

Inspirational

एक पत्र आजीसाठी

एक पत्र आजीसाठी

1 min
283

आजी तू सोडून गेलीस      

अनपेक्षितपणे न सांगता,

म्हणून हे एक पत्र तुझ्यासाठी

देवाघरी वाच मी धाडता....


खूप काही राहून गेलं गं

मनात माझ्या सलतंय,

तुझ्यासाठी शब्दांचं 

तसंच जपलंय वलंय....


आठवणीने हुंदक्यांना

अश्रू सावरून नेतात,

कुणी पाहू नये म्हणून

पदराआडूनच वाहतात....


आजी कसं सांगू गं तुला

तुझ्या ऋणातून व्हायचं उतराई 

सेवा करून खूप सारी

व्हायचं होतं तुझी आई...


नाही दिलीस संधी अशी

बाईपणानं मी ही बांधलेली,

पारतंत्र्याच्या हिशोबात

कितीदा देवाशी भांडलेली...


आठवून सारं काही मन

आतल्याआत आक्रंदतं,

तुझ्या त्या स्मृतींनी सहजच

काळीज माझं पाझरतं...


राहून गेलं खूप काही 

तू जवळ असतानाचं,

माझंच मन सतत टोचतं

नवल वाटून प्राक्तनाचं....


हृदयाचा एक कप्पा 

तुझ्याचसाठी मी जपलाय,

तुझ्यासोबतच देवाकडे

जन्म पुढचा मागितलाय.....


कशी आहेस तू ते

मी आल्यावर समजेलंच,

काळजी घे देवाचीही इतकी

आजी काय त्यालाही उमजेलंच


माझ्या आठवणीत रडू नको

देवासोबत भांडू नकोस,

खुशाल नांद देवाघरी

या चिमणीला विसरू नकोस...


माणसं असतात जवळ तोवर

सुखाची ओंजळ भरभरून द्या,

फिरून त्यांचे येणे नाही कधीच

मन भरून सहवास द्या...


Rate this content
Log in

Similar marathi poem from Inspirational