STORYMIRROR

Vaishnavi Kulkarni

Classics

3  

Vaishnavi Kulkarni

Classics

एक प्रसन्न पहाट

एक प्रसन्न पहाट

1 min
359

चहूबाजूला घातली गेलेली दवाची रांगोळी म्हणजे एक प्रसन्न पहाट |

मधूनच अंगावर शिरशिरी आणणारी खट्याळ शितलहर म्हणजे एक प्रसन्न पहाट ||

ढोलीत झोपलेल्या चिमण्या पिल्लांची कलकलती वाणी म्हणजे एक प्रसन्न पहाट |

पिल्लांची भूक शमविण्यासाठी पारवा - पारवीची चाललेली गडबड म्हणजे एक प्रसन्न पहाट ||

दुरून ऐकू येणारे मंदिरातील काकड आरतीचे मंजुळ स्वर म्हणजे एक प्रसन्न पहाट |

दारासमोर सडा घालत असलेल्या गृहलक्ष्मीचे स्वानंदी मग्न होऊन गुणगुणणे म्हणजे एक प्रसन्न पहाट ||

जात्यावर धान्य दळताना गायल्या जाणाऱ्या ओव्यांची मांदियाळी म्हणजे एक प्रसन्न पहाट |

गल्लोगल्ली दान स्वीकारून लेकरा - बाळांना आशीर्वाद देणाऱ्या वासुदेवाची गाणी म्हणजे एक प्रसन्न पहाट ||

अंगणात निसर्गाने घातलेला पारिजातकाचा गालिचा म्हणजे एक प्रसन्न पहाट |

हळूहळू साखरझोपेच्या दुलईतून स्वतःला सावरत , आवरत समोर येणारे जग म्हणजे एक प्रसन्न पहाट ||


Rate this content
Log in

Similar marathi poem from Classics