एक गुढी मांगल्याची
एक गुढी मांगल्याची
ज्यांनी छत्रपती शिवरायांना
ज्ञान, चारित्र्य, चातुर्य, संघटन,पराक्रम अशा राजस सत्वगुण देणा-या
राजमाता जिजाऊंच्या जन्मदिनी...
एक गुढी ऊभारु मांगल्याची...
गनिमी काव्याची पद्धत वापरून
आदिलशाही,निजामशाही,मुघलशाही
ह्यांच्याशी लढा देत देत
मराठी साम्राज्याचे बीजारोपण करणा-या
छत्रपती शिवरायांच्या जन्मदिनी...
एक गुढी ऊभारू मांगल्याची
स्वराज्य,स्वधर्म रक्षणासाठी
स्वराज्याच्या तेजस्वी सुर्याने बलिदान दिले
"मोडेन पण वाकणार नाही "
हाच बाणा घेऊन जन्मलेल्या....
छत्रवीर संभाजी राजेंच्या जन्मदिनी
एक गुढी उभारू मांगल्याची
ज्यांनी माणसाला माणूसपण दिले
संपुर्ण बहुजन समाजाचा उद्धार केला
मनुस्मृतीचे दहन करुन...
भारतीयांना "संविधान "हा पवित्र ग्रंथ
बहाल करणाऱ्या बाबासाहेबांच्या जन्मदिनी....
एक गुढी उभारू मांगल्याची..
