एक गोप तेव्हां स्त्रियेस सांगत
एक गोप तेव्हां स्त्रियेस सांगत
एक गोप तेव्हां स्त्रियेस सांगत । सांठवी समस्त नवनीत ॥१॥
देवाचा नवस आहे पुरवणें । धरावे येथून अनसुट ॥२॥
सांगोनिया ऐसें राहिला तो स्वस्थ । मागें स्रीनें कृत्य काय केलें ॥३॥
चोरोनियां घृत भरोनि घागरी । नेवोनि शेजारीं ठेवियेल्या ॥४॥
गौळियानें तेव्हां संकल्प सोडिला । नवस फेडिला नामा म्हणे॥५॥
