STORYMIRROR

Sant Namdev

Classics

2  

Sant Namdev

Classics

गडी आणि रमापती

गडी आणि रमापती

1 min
13.9K


गडी आणि रमापती । तेव्हां आनंदे जेविती ॥१॥


कोणी मांडिताती पानें । वरी ठेविताती अन्नें ॥२॥


कोणी ठेवी मांडीवरी । कोणी जेवी भूमीवरी ॥३॥


कोणी पसरिती चवाळें कोणी पसरिताती ॥४॥


गोळे घेऊनियां हातीं । येरयेरातें हाणिती ॥५॥


पाहताती देव । धन्य धन्य त्यांचा भाव ॥६॥


मिटकीया देती । देवा वांकुल्या दाविती ॥७॥


माया मोही ब्रह्मादिका । नामा म्हणे तेंचि ऐका ॥८॥


Rate this content
Log in

Similar marathi poem from Classics