कंस धाडी अधासुर
कंस धाडी अधासुर
कंस धाडी अधासुर । भारी नंदाचा कुमर ॥१॥ एक ओंठ खालीं । दुजा मेघाच्या मंडळीं ॥२॥ गाई गोपाळ उदरीं । देवा कळलें अंतरी ॥३॥ आंत प्रवेशला कृष्ण । रूप धरीत वामन ॥४॥ क्षणार्धेंचि मारी । भक्तजनांचा कैवारी ॥५॥ भेणें गोपाळ पडियेलें । कृपादृष्टी उठविलें ॥६॥ तेज अद्भुत निघालें । कृष्णमुखीं प्रवेशलें ॥७॥ भक्तासी रक्षीत । नामा म्हणे कृष्णनाथ ॥८॥