STORYMIRROR

Sant Namdev

Classics

2  

Sant Namdev

Classics

अनेक पुष्पांच्या साजताती माळा

अनेक पुष्पांच्या साजताती माळा

1 min
12.4K



अनेक पुष्पांच्या साजताती माळा । गुंजाहार गळां शोभताती ॥१॥ रक्त पीतांबर आरक्त अधर । चरणीं सुंदर चालताती ॥२॥ रक्त चंदनाची घेतलीसे उटी । मयूर पत्रवेठीं शोभताहे ॥३॥ शिंगे रंगविती देऊनियां रंग । चालत श्रीरंग मागें मागें ॥४॥ चित्तीं सर्वकळ राहे ऐसे ध्यान । नामा म्हणे धन्य तोचि एक ॥५॥


Rate this content
Log in

Similar marathi poem from Classics