उठोनी प्रात:काळी गौळणी बोलती
उठोनी प्रात:काळी गौळणी बोलती
उठोनी प्रात:काळी गौळणी बोलती । जाईल श्रीपती वना आतां ॥१॥ चला जाऊं त्याचें पाहूं गे श्रीमुख । हरेल ही भूक डोळियांची ॥२॥ तांतडीने येती नंदाचिया घरा । पहाती उदारा कृष्णराया ॥३॥ कुरळे हे केश सुहास्य वदन । आकर्ण नयन शोभताती ॥४॥ अरुणोदय प्रभा अधर दिसती । हिरे झळकती दंत तुझे ॥५॥ भोंवया व्यंकटा सुंदर नासिक । पाहोनियां सुख फार होय ॥६॥ लल्लाटीं शोभत केशराचा टिळा । वर बिंदु रेखिला कस्तुरीचा ॥७॥ वैजयंती माळा किरीत कुंडलें । नामयानें केले निंबलोण ॥८॥