STORYMIRROR

Sant Namdev

Classics

2  

Sant Namdev

Classics

शिवादिक ज्याचें बंदिती पायवणी

शिवादिक ज्याचें बंदिती पायवणी

1 min
13.9K


शिवादिक ज्याचें बंदिती पायवणी । पायांवरी न्हाणी यशोदा ते ॥१॥


नंद पुण्य लेखा नव्हे आम्हांप्रती । शुक परीक्षिती सांगतसे ॥२॥


सनकादिक ज्याचे ध्यानीं झाले पिसें । गायी चारीतसे गोकुळांत ॥३॥


गडीयासी काला वांटितो श्रीधर । कौतुक सुरवर पहाताती ॥४॥


नामा म्हणे सुख देईल भक्तांसी । वधील दुष्टांसी स्वामी माझा ॥५॥


Rate this content
Log in

Similar marathi poem from Classics