उठोनियां प्रात:काळी
उठोनियां प्रात:काळी
उठोनियां प्रात:काळी । देवें मुरली वाजविली ॥१॥
गडी मिळोनी समस्त । घ्या रे शिदोऱ्या सांगत ॥२॥
अलंकार घालिताती । दिसे सुशोभित मूर्ति ॥३॥
नामा म्हणे स्वामी माझा । आला भक्तांचिये काजा ॥४॥