प्रात:काळी मुलें येताती सकळ
प्रात:काळी मुलें येताती सकळ
प्रात:काळी मुलें येताती सकळ । ऊठ रे गोपाळा म्हण्ताती ॥१॥ आळस देऊनी उठे देवराणा । बळिराम गोधना सोडीतसे ॥२॥ माता देऊनि स्तन काकुळती येत । सांभाळा भगवंत वनामध्यें ॥३॥ जवळींच खेळा जाऊं नका दूरी । सांभाळा मुरारी प्राण माझा ॥४॥ होताती उत्पात याजवरी मोठे । मोडतील कांटे सांभाळावे ॥५॥ आसनीं शयनीं भोजनीं जतन करा । नामया दातारा केशिराजा ॥६॥