Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!
Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!

Sant Namdev

Classics

2.5  

Sant Namdev

Classics

चालियेलें तेव्हां गडी आणि देव

चालियेलें तेव्हां गडी आणि देव

1 min
7K

चालियेलें तेव्हां गडी आणि देव । खेळताती सर्व आनंदानें ॥१॥

वत्साचिया रूपें वत्सासुर आला । माराया कृष्णाला परीक्षिती ॥२॥

पाहोनियां ऐसें तयासी मारिलें । झोकोनिया दिलें आकाशांत ॥३॥

चला आतां जेवूं बैसूं एके ठायीं । काढा रे लवलाही शिदोरीया ॥४॥

गोपाळा मिळोनी आनंदें जेविले । ब्रह्मरसें धाले कृष्णासंगे ॥५॥

उदक प्राशन करावया आले । बकाने देखिलें कृष्णजीला ॥६॥

दुष्टबुध्दी तेव्हां देवासी गिळीत । हृदया जाळीत उगाळील ॥७॥

धरोनियां हातें उभाचि चिरीला । आनंद देवला न समाये ॥८॥

नामा आले घरासी सकळ । सांगताती बाळें वर्तमान ॥९॥

Rate this content
Log in

Similar marathi poem from Classics