STORYMIRROR

Aruna Jaju

Inspirational Others

3  

Aruna Jaju

Inspirational Others

एक दिवाळी अशीही

एक दिवाळी अशीही

1 min
282

देव्हाऱ्यातल्या देवाला

त्या रस्त्यापलिकडची वेदना का दिसत नाही..

उपास तर त्यांचाही घडतो रोज..

मग इच्छा त्यांच्या का पूर्ण होत नाही...


दिवाळीचा झगमगाट आज

सगळीकडेच दिसत आहे..

कष्ट आत थकलेल्या हातात

लक्ष्मी आजही रुसत आहे..


सांग ना रे देवा 

असा तुझा कोणता नवस बोलायचा

ज्याने अंधारलेल्या त्यांच्या जगात

दिवाळीचा आनंदमय प्रकाश व्हायचा..


त्या चिमुकल्या मनात अजून

दिवाळी पोहचली च नाही

पणत्या, आकाशकंदील ,फराळ पाणी , पटाखे,दूरच राहील

रोजची भूक अजून शमलीच नाही..


चला तर मग आपण सजवू

एक दिवाळी अशीही

प्रकाशित करू प्रत्येक मन

असेल हातात एकच पणती जरीही...


जुनाट कपडे देऊन

खूपदा दानी बनलो आपण

आज नव्या कोऱ्या कपड्यांचं 

देऊ त्या लक्तराणा औक्षण..


माणुसकीचा एक आकाश कंदील

मनाच्या गाभाऱ्यात लावू

आपल्या अंगणाचा प्रकाश

त्या अंधारलेल्या कोपऱ्यात ही देवू..


भरलेली आपली ओंजळ

खाली करू थोडीशी ही

मानवतेचा दीपक लावून

साजरी करू एक दिवाळी अशीही


Rate this content
Log in

Similar marathi poem from Inspirational