२०२१
२०२१
*खुप काही घडून गेलं..काही सुख कारक*
*तर विधिलिखित पण खूप हृदय विदारक*
*काही होत मनासारखं..*
*आन काही काटेरी कुंपणा सारखं...*
**कधी बनून ढाल लढले मी*
*कधी सोडून भान रडले मी..**
हसण्या रडण्याचा हिशोब जरा अवघडच होता
यावेळी मात्र दुःखाचं परडा जरां भारीच होता
या वर्षाच्या जमा खर्चात खूप बाकी होती
सगळ्या केल्या adjustment पण balance sheet tally नव्हती
ज्याला गमावलं तो प्राणप्रिय होता..
माझा सखा आणि सोबती होता
ती वेदना ते दुःख जीवघेणं होत
कदाचित प्रारब्धाच ते देणं होत
निराश्येच्या गर्द छायेत मी पूर्ण होते बुडाले
नव्हते मी माझी सगळे अंधकरात दडले
एक दिवस अचानक माझ्या लेखणीला माझी दया आली
माझ्यातल्या हरवलेल्या लेखिकेला जाग आली
त्या निराशेत माझ्या शब्द माझे सखे बनले
त्या शब्दांनीच माझ्या दुःखाचे ओझे पेलले
भेटले नवे आणि अनोळखी सोबती
जुळला असा ऋणानुबंध जणू जन्मोजन्माचे संगाती
तोही भेटला मला अचानक याच वळणावर
एकांत ही मनाला भावतो त्याला बोलल्यावर
माझी गझल माझी कविता पुन्हा नव्याने बहरली
गेला ग्रिष्माचां दाह वसंताची पालवी मोहरली
आले तसे सरले हे वर्ष ही मागच्या प्रमाणे
पण शब्दाची ऋणी मी, वाढले त्याचे देणे
जे गमावलं त्यालाही घेते कवेत
जे कमावले तेही सोबत आहेत
आसू आणि हासू सगळेच आपले
मनामध्ये अजूनही मी आशेचे अंकुर जपले
**साहित्याच्या या गंगेत एक धार माझी असेल नेहमी*
*कविता अन् गझल बनून तुमच्या ह्रुदयात वसेन मी*
*देणे घेणे आयुष्याचे अविरत असेच राहील*
*नव्या वर्षकडे नेहमीच मी नव्या उमेदीने पाहीन..*
