बरसणारा तो
बरसणारा तो


बेधुंद बरसणारा तो
त्या बरसण्यात जगणारे
माझा तो आणि मी
आठवणी साठवत जातो भिजता भिजता
दोघेही लहरी
मनाचा थांग दोघांचा ही लागत नाही
आले की दोघेही बेभान होवू बरसतात
मला काय वाटेल याचा विचार न करता
मग उरतात अस्ताव्यस्त झालेल्या
अवकाळी पावसाच्या आणि नात्याच्या
विखुरलेल्या खाणाखुणा
नाकीनवू येते मला सगळं सावरता सावरता
तरीही आवडतात मला ते दोघे
अगदी मनातून कारण
त्यांच्या धसमुसळेपणात मन सोक्त जगते
कशाचाही सारासार विचार न करता
कणाकणातून रोम रोम
भिजवून जातात माझे ते दोघेही
बाकी मी माझीही उरत नाही
त्यांना मिठी मारता मारता
ते दोघे ही सोबत यावे खूपदा वाटत
गारव्यात त्या नेहमी जगावस खूपदा वाटत
पण दोघेही मन मौजी , बेलगाम
मीच उरते शेवटी दोघांचीही वाट पाहता पाहता