मन माझे आहे लहान अजुन
मन माझे आहे लहान अजुन
1 min
5
बालपण माझं घेतलं तू हिरावून
वाकुल्या तू दाखवत होतास दुरून
वाटलं असेल तुला तू जिंकलास
निरागसता माझी दाखव घेवून
मोठे पानाचा दिमाख तुझा भारी
हे वाढत्या वया तूही घे थोड समजून
माहित आहे तुला अभिमान तुझ्या असण्याचा
जरा बघ थोड अल्लडपणाने वावरून
परिपक्वता ,जबाबदारी अशी अवघडल्या
शब्दाने तू येतोस सजून धजून
पण मीही जरा नाठाळ आहे
तुझ्या येण्याने मी नाही जात भारावून
मनातल्या माझ्या बालकाला
बघ तू जावू शकतोस का घेवून
वा ढत्या वयाची आणि मनाची नाही घालत मी सांगड
कारण वय ते तर वाढणारच
पण मन माझे लहानच आहे अजून
