सल अंतरीचा
सल अंतरीचा


जीवघेणा आक्रोश
नाराज स्वप्नांचा
अपूर्ण राहिलेल्या
त्या बेभान क्षणांचा
दाखवू कसा रे व्रण
त्या हसऱ्या जखमांचा
तुझ्या मधाळ वाणीत
फितूर झालेल्या मनाचा
सांग देऊ कसा प्रकाश
वादळातल्या दिव्याचा
कसा ठेवु विश्वास
मृगजळापरी नात्याचा
आणाभाका घेतल्या ही खूप
पण काय मोल माझ्या अग्नीपरिक्षेचा
तू जोडशिल परत नाव माझ्याशी
पण काय अर्थ तुटलेल्या आरशा चा
येशील ही परत तू
पण सांग कसा लपवू सल अंतरीचा....