Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!
Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!

Aruna Jaju

Inspirational Others

3  

Aruna Jaju

Inspirational Others

का? कोण जाणे?

का? कोण जाणे?

1 min
167


घट्ट त्या नात्याची न जाणे वीण का उसवली आहे ?

गर्भार होती भावना पण ती कविता कूठे प्रसवली आहे ?


स्त्री स्वातंत्र्याचे गोडवे गायले जरी घराघरांतून

हुंड्यासाठी वरात आजही मांडवातून का परतली आहे ?


गाठला उच्चांक जरी आधुनिकतेने पावलोपावली 

नितीमित्तेच्या मुल्यांकाची पातळी का घसरली आहे ? 


सांजवेळी प्रतीक्षेत आहेत घरटी केविलवाणी

घेतली भरारी ज्या पिलांनी परतण्यास का विसरली आहे ?


तोडली नाळ मातीशी परकी झाली गाव शिवार

सिमेंटची निर्जीव जंगले का इतकी पसरली आहे ?


विकले तिने शरीर कितीदा आपल्या बाळासाठी

मातृत्वाची अशी परीक्षा पान्ह्यात का झरली आहे?


रात्रभर जागली सखी मिलनाच्या धुंदीत त्या

डोळ्यात अजूनही विरहाची रात्र का उरली आहे ?


Rate this content
Log in

Similar marathi poem from Inspirational