गुलाब आठवणीतला
गुलाब आठवणीतला
गुलाब म्हणताच आठवण तुझी आली
गुलाब कळी माझ्या गालाची अचानक खुलली
तो दिवस आठवणीतला खुदकन हसला
गुलाब देतानाचा तुझा मोहक चेहरा दिसला
धडधड हृदयाची केविलवाणी लपून होती
ती वेळ ती जागा आणि त्या प्रेमाची निशाणी जपून होती
कदाचित यावेळी तो ही सुकलेला गुलाब बघत असेल
आणि आमच्या त्या अधुऱ्या प्रेमाला आठवत असेल
प्रेमगाथा काही राहतात अधुऱ्या ..अपूर्ण..अधांतरी
पण कोरून असते त्याचे अस्तित्व खोल काळजावरी

