असा वाटतय तुझ माझ्यावर प्रेम आहे
असा वाटतय तुझ माझ्यावर प्रेम आहे
जीवनच गीत मनसोक्त गाताना
तुझा सुर माझ्या सुरत मिळाला
पहिल्या भेटीतच तुझा सहवास
उगीच आपलासा वाटला
तू जाताना वळून पाहिलंस
आणि नकळत तुझे होंठ हसले
तुझ्या डोळ्यात ल्या आपले पणाला पाहून
असा वाटतय तुझ माझ्यावर प्रेम आहे
मैत्रीतून फुललेलं तुझ माझं नात
त्या नात्यानं प्रेमाचं नाव घेतलं
ओठातल्या नकरापेक्षा मनातल्या होकरावर
भावनेचं ओझं पेलल
अंतकर्णाच्या हळव्या कोपऱ्यान
स्पंदनातून खूनावल
असं वाटतंय तुझ माझ्यावर प्रेम आहे
तुझ्या स्पर्शाने कुरवाळले ली
प्रीत माझी फुलली
श्रावणात च काय पण ती
ग्रीष्मात ही फुलली
माझी वाट पाहत तू उन्हात उभा होतास
पण तुझ्या मनातल्या गारव्यान सांगितलं
असा वाटतयं तुझं माझ्यावर प्रेम आहे
समाजाची बंधनं झुगारून
तू मला स्वीकारलस
सप्तपदी सात वचना सह मला
अर्धांगिनी केलंस
तुझ्या माझ्या अस्तित्वाचा एकच भाव उरला
दोन हृदय एक जीव बनलेल्या आत्म्यान हुंकरल
असं वाटतंय तुझं माझ्यावर प्रेम आहे
भावना न कर्तव्य जगत
संसाराचा सारी पाट खेळू लागलो
११ अकराच समंतरण जावून
१+१=3 चं अस्तित्व पाहू लागलो
तुझ्या माझ्या प्रेमाच प्रतीक अंकुरल
दृढ झालेल्या नात्याने
जन्माला आलेल्या नवीन नात्याने साद घातली
असा वाटतयं तुझं माझ्यावर प्रेम आहे..
कधी विचारांची मतभेद झाली
कधी शब्दांची बोलाचाली झाली
कधी रुसला तू माझ्यावर तर कधी
माझी सोबत अबोल झाली
पण माझ्या लटक्या रागावर नेहमीच
तुझ्या निःसीम प्रेमाने मात केली
त्यावेळी तुझ्या ओंठात लपलेली माझी गालावरची खळी
हळुच बोलली
असं वाटतंय तुझं माझ्यावर प्रेम आहे
जीवनाची सायंकाळ आता खूनवू लागली
खऱ्या अर्थानं तुझ्या आधाराची गरज वाटली
तुझ्या काळ्याभोर केसात थोडी थोडी चांदी पिकली
अन् माझ्या निरागस लावण्यात अनुभवाची किनार आली
तुझ्या बाहुपाशात शेवटचा श्वास घेतला
तुझा थरथरता हात माझ्या हाती आला
त्यावेळी तुझ्या डोळ्यातून येणाऱ्या
आसवांनी साक्ष दिली
असं वाटतंय तुझं माझ्यावर प्रेम आहे
माझ्या निश्चल शरीरावर जीव तोडून रडलास
तुझ्या भरल्या डोळ्यातून माझा अस्तित्व शोधू लागलास
काही क्षणांच्या विरहतही तुला माझ्याविना नाही करमल
नकळत तुझ्या श्वासांनाही त्यावेळी थांबव वाटल
त्याक्षणी तुझा माझ मिलन अमर झालं
एकमेकात विलीन झालेल्या आपल्या आत्म्यांन
आपल्याला वेगळं समझानर्या जगाला ओरडून सांगितलं
असं वाटतंय तुझं माझ्यावर प्रेम आहे

