STORYMIRROR

Ashwini - Mishrikotkar

Inspirational

3  

Ashwini - Mishrikotkar

Inspirational

एक असीम तारा

एक असीम तारा

1 min
232

क्षितिजापलीकडून उगवला

एक असीम तारा

स्वातंत्र्यासाठी झगडला

एक झंझावाती वारा


बंड पुकारले दलितांसाठी

नाव बाबासाहेब आंबेडकर

या महाराष्ट्राच्या नेत्यासम

नाही कोणता वीर धुरंधर


मोकळे केले मंदिरे,चवदार तळे

श्वास केला मोकळा

शिक्षणाच्या ज्ञानगंगेत

न्हाऊन काढले सकळां


गरीबी आणि भुकेची जाणीव

नेहमीच होत राहिली

झटून दुसऱ्यांसाठी मात्र

केली जीवाची काहिली


संविधान अमलात आणले

न्यायासाठी झगडले

हाती धरून लेखणीची तलवार

दुष्मनांचे काळीज चिरून काढले


Rate this content
Log in

Similar marathi poem from Inspirational