STORYMIRROR

Pandit Warade

Inspirational Others

3  

Pandit Warade

Inspirational Others

दयाळा

दयाळा

1 min
273

भेट तू दयाळा  

कृपाळू अनंता

घालवावी चिंता

जीवनाची ।।१।।


तुझ्या दर्शनाची

लागलीसे आस

तोचि एक ध्यास

जीवा माझ्या ।।२।।


कर्ता करविता

धनी बोलविता

चाले तुझी सत्ता

आम्हावर ।।३।।


आली महामारी

कशी करू वारी

तूच आता तारी

पांडुरंगा ।।४।।


दृष्टी हीन झालो

वाचा क्षीण झाली

गात्रे ही गळाली

येऊ कैसे ।।५।।


होई कासावीस

भेटीसाठी जीव

येऊ द्यावी कीव

लेकराची ।।६।।


दास पंडिताची

पुरवावी आस

अंतकाळी खास

भेट द्यावी ।।७।।


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Inspirational