दूर केला अंधार
दूर केला अंधार


क्रांतिसूर्य ज्योतिबा सम महात्मा
नाही जगी या कधीच होणार !
पेटवून ज्ञान ज्योत त्यांनीच
दूर केलाय साराच अंधार...
अविध्येचा अनर्थ करूनी या दूर
केले ज्योतीबाजींनी उपकार फार,
खाल्ले दगडगोटे,शेणाचा ही मार
बहुजनांचा खरा केला हो उध्दार...
लई अनमोल समाजकार्य
दिली समतेची शिकवण,
किर्ती जगी त्यांची महान
केले प्रबोधन,अनिष्टतेवर प्रहार..
समाजोध्दारांसाठी झगडले
कर्मटावर आसूड ओढले,
सत्यशोधकी घडविले, घडले
आयुष्य वेचले त्यांनी सारं...
न्याय, हक्काचा लढा दिला
उध्दार राष्ट्राचा या केला,
मार्ग समतेचा जगा दाविला
असा महात्मा जगी न होणार..
महती ज्योतीबांची आज गाऊ
शिकवण जगाला त्यांची देऊ,
त्यांचा वारसा पुढे चालू ठेऊ
देऊ क्रांतीची मोठी ललकार..