STORYMIRROR

Kshitija Bapat

Tragedy Others

4  

Kshitija Bapat

Tragedy Others

दुष्काळ

दुष्काळ

1 min
352

तप्त उन्हाने तापलेल्या

भेगा पडलेल्या जमिनीला

वनवा पेटलेल्या रानाला

कोरड्या पडलेल्या नदीला


तहानलेल्या प्राण्याला

जनसामान्य जीवनाला

दुष्काळ पडलेल्या भागाला

पावसात तुझीच आस


घालून जीव धोक्यात

लोटी भर पाणी मिळवतात

नळा जवळ भांड्याचा

रांगाच्या रांगा लागतात


टँकर गावात आले असताना

धावतात सर्व बायका-मुले

पाणी मिळावे म्हणून

आपसात भांडतात सारे


पाण्याचा एक एक थेंबाला

जनावर लागली मुकायला

दुष्काळाने घेतला कित्येकांचा बळी

सर्व ठिकाणी पेटले पाणी


Rate this content
Log in

Similar marathi poem from Tragedy