दुरितांचे तिमीर जावो
दुरितांचे तिमीर जावो
ज्ञानदेव मागे पसायदान
दुरितांचे तिमीर जावो|
अती सुंदर विचार तयांचे
सदैव आचरणात राहो||१||
सुखा पासून वंचित जन
जे इच्छितात मिळो त्यांना|
भरकटलेल्या समाजाला
सन्मार्ग दिसो सापडतांना||२||
प्रेमाला पारख्या अनाथांना
मिळो हक्काचे प्रेम त्यांना|
चिंतामणी लाभावे रत्न त्या
सुर्याहून तापहिन सज्जनांना||३||
रंजल्या गांजलेल्या अज्ञानी
जनांना ज्ञानाची होवो प्राप्ती|
चंद्रासम लांछन नसलेल्या त्या
सोय-यांना सुखाची कळो व्याप्ती||४||