STORYMIRROR

Trupti Naware

Inspirational

0  

Trupti Naware

Inspirational

दुरावा

दुरावा

1 min
511


दुरावा असा बोलका की

करत होता आर्जवे

मी माझी ,..

तु तुझाच...

यामधली निरव शांतता

नि किर्र करणारी

दिसली काजवे

मैलोनमैल अंतर पायाचे

तरी कमीतकमी चालायचे

दुरावा असा जवळचा की

सांगितली त्याने सारी गुपीते

तुझं काय ...

माझं काय..,

सारेच आता उणे उणे

दुरावा आता सरला होता

कसा काय ..

कळले नाही

त्याचेही दावे

दिसले मग

काही खोटे...

काही फसवे...

मी दुराव्यासोबत

दुरावा माझ्यासोबत

दुरावले अंतर

किती आणि कसे

मध्यान्ह जळते

सांज वितळते

काळोखाच्या दारी सजले

आसवांचे दिवे...!!!!


Rate this content
Log in

Similar marathi poem from Inspirational