STORYMIRROR

Mrudula Raje

Romance Tragedy

3  

Mrudula Raje

Romance Tragedy

दुरावा

दुरावा

1 min
473

रागावून गेलास दूर तू , पाठ फिरवली माझ्याकडे।

नको विसरू परी मला तू, घालते तुज साकडे॥


आठव तो बहर प्रणयाचा, आठव तो फुलला वसंत।

गुलमोहर फुलला वाटेवर, तू का असा सोडलास पंथ॥


काय झाली चूक माझी, काय असा घडला गुन्हा।

साद घालिती प्राण माझे, तू परतुनी येईना पुन्हा॥

 

राग-रुसवा मनात ठेवून, जाशी जरी तू दूर देशी।

एक प्रार्थना अखंड करते, नको बाळगू अढी मनाशी ॥


नाही बंधन माझे तुजवरी , मुक्त तू ह्या अंबरी।

प्रेम तुझ्यावर करिते परी मी, खूणगाठ बांध ही अंतरी॥


Rate this content
Log in

Similar marathi poem from Romance