दुःखास येथे मान आहे
दुःखास येथे मान आहे
पायी वहाण नाही,गावात मान नाही
जगणे असे तसे , आज दुःखास मान आहे
एकून घ्यावयाचे, माझ्यात त्राण नाही
सारेच मम सुखाचे, त्यालाच दान आहे
बेताल वक्तव्य त्यांचे, त्यांनाच जाणं नाही
होणार दुःख अंती, कोणास भान आहे
उद्दाम माणसांना, कोठेच वाव नाही
दुबळ्या अशा मनाचे, भितीस वाण आहे
मोठेपण तुला मी, देण्याइतकी महान नाही
कवितेत जग जगणे, रुपगंधा मी खुशाल आहे
