प्रेम
प्रेम
मनी लाजली
रंग केशरी
गंध सुगंधी
प्रीत साजरी
प्रेमाचे बंध
होता बेधुंद
एकमेकांच्या
प्रितीचा गंध
रात्र अंधारी
झाली बावरी
नवी नव्हाळी
स्पर्श सोनेरी
क्षणा क्षणात
मन माझेच
मद मस्तीत
संग तुझाच
आयुष्यभर
हातात हात
संकटातही
तुझीच साथ

