धुंद दिशा
धुंद दिशा
1 min
110
सुवर्ण रक्तीम आभा
ल्यायली सांज सावळी
हुरहुर दाटे अंतरी
मम प्रतिक्षा झाली खुळी
चांदण्यांची खडी साडीवर
काळी चंद्रकला नेसली निशा
प्रियेची चाहूल लागता
प्रीतगंधाने धुंदल्या दाही दिशा.
रातराणी बहरली सुंदर
धुंद गंध स्वार वा-यावर
हळदुल्या देहगंधाने
मीही स्वार सुख स्वप्नावर.
चंदेरी किरणे गवाक्षी
चंद्रमा ही असे साक्षी
प्रीतफुले फुलू लागता
प्रिया लाजली मस्त अशी
प्रणयगंधात धुंदलो
धुंदीत सरली निशा
प्रीतगंध दरवळ, लेवूनी
उगवली मम उषा.
