STORYMIRROR

Rupali Tapkire

Others

3  

Rupali Tapkire

Others

अव्यक्त

अव्यक्त

2 mins
7

अजूनही काही बदलेलं नाही...

काहीच नाही .

आपण दोघही आपापल्या स्वभावानुसारच वागतोय ..

म्हणजे बघ ना...

माझं मन मोडण्याची तू एकही संधी सोडत नाहीस...

आणि माझं जीव लावणं काही केल्या संपत नाही.

सगळं कसं एकदम सुरळीत चाललय.

कधीकधी वाटायचं तू खूप उंचीवरती आहेस...आणि माझे हात तोकडे पडताहेत तुला स्पर्श करण्यासाठी...

आणि तू म्हणायचास आपलं समज म्हणजे अंतर नाहीस होईल...

.. मी तर कधीचच...

 ...तुझी नजर पोहचत नाहीया का माझ्यापर्यंत...?

हवं तेव्हा रिता झालास...

ओठांतून... डोळ्यांतून...

मन मोकळं केलसं...

किती हमसनू रडलास...

इतका...की कुशीत घेऊन थोपटावसं वाटलं होतं क्षणभर पण... असो...

तू मोकळं केलेलं मन घट्ट बांधनू ठेवलय मी माझ्या मनात..

सांत्वन करणं मला तसं फारसं कधीच जमलं नाही...

सोबत असण्याचा प्रयत्न मात्र चाललायं..

आणि तू..

हे सगळं विसरून जा म्हणतोस..

कोणता खरा आहेस.?

कुशीत घ्यावसं वाटावं इतपत रडणारा...?

की... हा "विसरून जा" म्हणणारा..?

तुझी कारणं मला कळलीच नाहीत..

आणि तुला माझं मन...

निदान सांगून तरी जायचसं ना...

उगाच घोर लागतो न केलेल्या चुकांचा...

वाट बघणं आहेच शेवटी हातात ...

हातातून सगळं निसटल्यासारखं वाटत असलं तरीही...

आदरयुक्त कौतुक वाटायचं तुझ्या संयमी असण्याचं..

"याच वेळात बोलायचं, इतकच बोलायचं" किती शिस्तबद्ध वाटायचं सगळंच...मग मला मीच उथळ असल्यासारखं वाटत रहायचं तेव्हा ...थांबायचे मग बळंबळंच...

पण किमान मोकळेपणा होता माझ्या वागण्याबोलण्यात...जे पोटात तेच ओठांत ...

संयम आणि शिस्तीच्या बुरख्याआड टाळलं नाही तुला कधीच...

प्रेमात कसले आलेत नियम...?

गर्दीतला नाहीस तू...

तू वेगळा आहेस...

...म्हणजे वाटत आला होतास आजवर...

अगदी माझ्यासारखा वाटायचास...तिरकस बोलण्याची तर चढाओढ होती अक्षरशः...

...हं पण मी दुखावलं नाही कधीच...शिवाय मी तिथेच आहे अजूनही...

तू...असो

...आणि ऐक ना ...

बाकी दे सोडून सगळंच ...

चुकून भेट झालीच तर ... ओळखीची एक बरी व्यक्ती म्हणनू बोलत जा कधीतरी ...

 बरं वाटेल ...


Rate this content
Log in