रे s s घना
रे s s घना
अशा अवेळीला बाई
तुझ्या माझ्या पावसाला
हे साचत चाललंय तळ
पावसाच्या थेंबानी
वाटतय एकेक होडी
सोडावी त्यावर
अलगपणे मनात माझ्या
तरंगणाऱ्या कागदी
होड्यांची आकार पक्के
होत चाललेत
शब्दा शिवाय मनावर
कोरल्या जातात .....?
थोड्याशा पावसानेही
भिजवून धरेला उरतो
जरासा लाजरा वेल्हाळ
मल्हार सरीत श्वासात रुजतो
झाड मोहरलय .....
पानांचा रंग
गडद पाचूचा खास असा ...
अशा गच्च तृप्तीने डोलतय
पाखरांना खुणावतय .....
थोडीशी ओलसर पानं
त्यातून सांडणारा तेजस्वी रंग
हिरव्या कंच आठवणींनी
उजाळा देतोय....
पावला पावलान पुढे
सरकताहेत.....
