STORYMIRROR

Rupali Tapkire

Classics Fantasy

3  

Rupali Tapkire

Classics Fantasy

आंतरिक समाधान

आंतरिक समाधान

1 min
164

मनी राग लोभ ।संपवी विवेक

होता अतिरेक । सरे सुख ।।१।।


नको मनी कधी।द्वेषाची भावना

सुखाची कामना । सदोदित ।।२।।


रूजवावा नित्य ।मनी प्रेमभाव

ठेवा सदभाव। । सर्वकाळ ।।४।।


सोडूनी विकार ।मोद मनी भरा

मंत्र असे खरा । जगण्याचा ।।४।।


संतकृपा योग ।जीवनात यावा

भोग हा सरावा ।कु कर्मांचा ।।५।।


करूनी सत्कर्म।संपवा लालसा

नाही भरवसा ।क्षणाचाही ।।६।।


सांगते सुरेखा ।नको मनी स्वार्थ

साधा परमार्थ । अखंडित ।।७।।



Rate this content
Log in

Similar marathi poem from Classics