दु:ख वांझ पनाच
दु:ख वांझ पनाच
मातृत्वाला नव्हता पाझर
वांझ पनाला पडली बळी
मुल बाळ नव्हतं नशीबी
वाझं म्हणुन ओळख वेगळी
कसा दैवाचा खेळ भयानक
दोष सारा लादला तिच्यात
नाही मुल बाळ होतं म्हणून
निंदा तिची सर्वत्र जोमात
खंत वांझेचे सांगणार कुणाला
झाली निंदेचा विषय वांझ बाई
आली दु:खाला अफाट भरती
तरी आशा तिची ती लेकराची आई
तिला तहान लागली मातृत्वाची
जणु चातक झाली लेकरासाठी
कधी दाटेल मातृत्वाचे नभ
झाली आतूर माय रस पाजण्यासाठी
मनी लेकराची आस घेऊनी
क्षणा क्षणाला झुरायची
दुस-यांचे लेकरू पाहून
आनंदाने क्षणांत फुलायची
भ्रुण हत्याची बातमी ऐकता
जीव तिचा कासाविस होई
विचारांच्या वादळत एकटी
मातृत्वासाठी लाचार होई
कानी पडता वांझुटी शब्द
टोचतात असंख्य शर काळजात
तिच्या भावनांना समजनार कोणी
नको रे देवा वांझ पना दैवात
