दृष्टी (काव्यांजली)
दृष्टी (काव्यांजली)


अंधार जग
मन होतसे कष्टी
भासते सृष्टी
काळोखी........१
पांढरी काठी
आधार देते नित्य
पचवणे सत्य
कठिण.........२
जीवनी अडथळे
किती तरी येती
सोबत देती
परके...........३
नेत्रदान चळवळ
पडते ती अपुरी
माहिती अधुरी
अडसर........४
सम्यक दृष्टी
बाळगली जर तुम्ही
पाहु आम्ही
दुनिया..........५