STORYMIRROR

काव्य चकोर

Inspirational

3  

काव्य चकोर

Inspirational

दर्जी

दर्जी

1 min
410



हल्ली, रेडिमेड कपड्यांच्या जमान्यात,

दर्जीच्या दर्जाला विशेष महत्व असावे,

असे कुठेही वाटत नाही..

आणि पूर्वीच्या शिलाईचा

तो सुबक एकसंधपणा

आता शोधूनही सापडत नाही..!!


तसे अपवाद आहेत म्हणा

काही मोजके दर्जेदार दर्जी

पण तेही ब्रँडच्या दावणीला बांधलेले दिसतात..

आता त्याच ब्रँडच्या नावाखाली

ते वाटेल तो माल खपवतात..

आणि हवसे, गवसे, नवसे

केवळ नावानेच हुरळून जातात..!!


मी पाहतोय

हल्ली गल्लीबोळात खोके टाकून बसलेले ते चमको दर्जी,

शिवणकलेच्या नावाखाली

बिनबोभाट रफूघर चालवताना दिसतात..

आणि इकडची ठिगळं तिकडे जोडून

ते बेमालूम कपडे सांधतात..!!


पण ब्रँडच्या याच साठमारीत

बिचाऱ्या घरंदाज दर्जीची

कुचंबणा होताना दिसतेय..

पण तरीही तो आपलं काम

अविरत मेहनतीने आणि निष्ठेने

करताना दिसतोय..!!


त्याला नसतो कोणत्या ब्रँडचा आजार

कारण तो स्वतःच असतो एक निश्चित उपचार..

त्याच्यावरही विश्वासणारा विशिष्ट वर्ग असतो

आणि त्या वर्गावरच

तो अतीव समाधानी दिसतो..!!


Rate this content
Log in

Similar marathi poem from Inspirational