दरिद्री नारायण
दरिद्री नारायण
मी आंधळा दीन दुबळा
हाती माझ्या कुबड्या
घेऊन कपड्याचा गाठोडा
भीक मागतो सगळ्यांना
अन्न वस्त्र निवारा
नाही कुठला आसरा
मळलेल्या शरीरावर
आकाशाचा सदरा
फिरतो बनवन एकटा
अंगावर कपडा फाटका
मागतो भाकरीचा तुकडा
दरिद्रा चा हा दुखवटा
दिनदयाळा देवा
का येत नाही माझी दया
भीक मागणे वाटते
हेच आहे माझ्या भाग्याला
